औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द झाल्यानंतर तेथील खासदार इम्तियाज जलिल यांनी काढलेली मिरवणुक त्यांना भोवणार असे दिसत आहे. या जल्लोष प्रकरणात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये जिल्हाप्रशासनाकडून लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. भाजपाने या निर्णयाला जोरदार विरोध नोंदवला होता. त्याविरोधात पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देखील दिला होता. मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला होता.
हे ही वाचा:
औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा
अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक
इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश
मात्र हा लॉकडाऊन उठवला गेल्याचे श्रेय जलिल यांनी घेतले आणि इम्तियाज जलिल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आला. मास्क, सोशल डिस्टसिंग यांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे इम्तियाज जलिल यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर भाजपाकडून इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याबरोबरच जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील भाजपाकडून देण्यात आला होता. सर्वसामान्यांवर संचारबंदीचे नियम तोडले तर लगेच कारवाई होते, मग खासदारांनी नियमांचे उल्लंघन केले तरी साधा गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला नाही, सरकार आणि एमआयएम यांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील यावेळी भाजपाकडून करण्यात आला होता.