मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. काल, २२ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंड पुकारलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आणि त्यानंतर त्यांनी आपलं शासकीय निवासस्थान सोडलं. यावेळी हजारो शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांचं आभिवादन स्वीकारलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी करोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. मलबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिवसभर माध्यमांकडून देण्यात आली होती. शिवाय फेसबूक लाईव्हमधून जनतेशी संवाद साधताना देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्याला करोनाची बाधा झाल्याचं सांगितलं होतं. मात्र, असं असताना देखील मुख्यमंत्री अनेक शिवसैनिकांना भेटले, असा आरोप बग्गा यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत बग्गा यांनी ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू

संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

करोना नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्यास संबंधित व्यक्तीला कुणालाही भेटता येत नाही. रुग्णाला गृहविलगीकरणात राहावे लागते. असं असताना देखील मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचं बातम्यांमध्ये दिसलं आहे. याआधारे तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version