उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नावे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील टेंभीनाका येथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजपा नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील दत्ताराम ऊर्फ बाळा सखाराम गवस यांनी आमदार भास्कर जाधव, खासदार व सचिव विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, ठाणे महिला आघाडी अध्यक्षा अनिता बिर्जे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, ठाणे शहरप्रमुख केदार दिघे, नगरसेवक नरेश मणेरा, सुभाष भोईर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे व सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?

अनिल देशमुखांचा मुक्काम १ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल तलवार’

कलम १५३, ५०० आणि ५०४ तसेच कलम १५३ अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम ५०० आणि ५०४ अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version