चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा

चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेसंबंधित हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने काही अटी घालून सभा घेण्याचे निर्देश दिले असताना काही अटींचे उल्लंघन झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या सभेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांच्या भाषणाचा आणि एकूणच सभेचा अभ्यास केला होता. त्यानंतर गृहमंत्रालयात अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभेसाठी १६ अटी ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांच्यावर कलम १३५, ११६ आणि ११७ अंतर्गत आणि इतर कलमांतर्गत राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी १५३ (अ) अंतर्गतही राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा:

जोधपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटांत राडा

‘अ‍ॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री

राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’

भारत जर्मनीत हे बंध होणार दृढ

मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी ‘टीव्ही ९’शी संवाद साधला. सभेसाठी घातलेल्या अटीच चुकीच्या असल्याचे त्यांनी म्हटले. १५ हजार लोक सभेला येऊ शकतात अशी परवानगी देण्यात आली होती. मात्र, आम्ही काय मोजून लोकांना आत पाठवणार होतो का? आणि घटनास्थळी पोलीस हजर होते मग त्यांनी १५ हजार लोक जमल्यानंतर बाकीच्या लोकांना का थांबवलं नाही? असे सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केले आहेत. हा गुन्हा दाखल होणं म्हणजे राज ठाकरे यांना अटक करण्याची तयारी असल्याचेही अविनाश जाधव म्हणाले.

Exit mobile version