राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. मात्र, त्यानंतर शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडतील असे भाष्य केल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.
नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारणा शरद पवारांना केली. राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला, पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते. नितेश राणे हे हिंदू- मुस्लिम गटात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं
सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार? बातमीने खळबळ
विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण
‘द काश्मीर फाइल्स’ची टीम भेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींना
“मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?” असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला होता.