राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आता भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवार ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊत यांनी केला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणण्यचे काम किरीट सोमय्या करत असतात. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर काल संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर INS विक्रांत संबंधी आरोप केलेत.
हे ही वाचा:
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?
अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात
त्यावर किरीट सोमय्या यांनीही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, आतापर्यंत १७ आरोप केलेत त्याच काय झालं? असा सवालही त्यांनी विचारला.