छतीसगडमध्ये आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कालीचरण यांनी गांधीजींविषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या भाषणात समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विधानांचाही समावेश होता.
महात्मा गांधींविषयी कालीचरण महाराजांनी अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरले आहेत. त्यानंतर त्यांनी गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे त्यांनी आभार मानले. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.
हे ही वाचा:
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी
१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी
पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी
विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट
कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकावरही जोरदार निशाणा लगावला आहे. धर्माची रक्षा करण्यासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख करायला हव, असे म्हटले आहे. छत्तीसगडमधील सरकार हे पोलीस प्रशासनाचे गुलाम आहेत. त्यामुळे याठिकाणी कट्टर हिंदू नेता मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून पोलिसांनी टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कालीचरण महाराज हे महाराष्ट्रातील अकोल्याचे आहेत. त्यांचे मुळ नाव हे अभिजित धनंजय सराग आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतही त्यांनी कोरोना महामारीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे, असे विधान कालीचरण महाराज यांनी केले होते.