आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली दसून येत आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल आहे. बांगर यांच्या बरोबरच हि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य ३० ते ४० जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केली होती . यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सरकारी कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण करताना दिसत आहे.महाविद्यालयातील अनेक महिला शिक्षकांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्याध्यापक विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. यानंतर संतोष बांगर यांनी कॉलेज गाठून प्राचार्यांना मारहाण केली.
मीडिया सातत्याने संतोष बांगरची दादागिरी म्हणतोय. मात्र तुम्ही तिथे जाऊन दूध का दूध पानी का पानी करून दाखवावे. उपमुख्यामंत्र्यांना मी त्या महिलेची क्लिप ऐकवली त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली अशी प्रतिक्रिया बंगाल यांनी नुकतीच दिली होती.
हे ही वाचा:
इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा
अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!
प्राध्यापकाला मारहाण केल्याचं प्रकरण आठ दिवसांपूर्वीच असून त्यावेळी ते शिक्षक का समोर आले नाहीत? असा सवालही बांगर यांनी केला. त्या महिलेने उपमुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार सांगितला आहे. महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास मी असे अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे. चौकशीला समोर जायला तयार आहे असेही बांगर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता बांगर कोणती भूमिका घेतात याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. याआधी, महाराष्ट्राचे बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटी मजुरांना निकृष्ट माध्यान्ह भोजन पुरवल्याबद्दल एका खाजगी खानपान व्यवस्थापकाला अपशब्द वापरल्यामुळे अडचणीत आले होते.