दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह आणखी २० ठिकाणी सीबीआयने शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी छापेमारी केली. साधारण १४ तास तपास हा तपास सुरू होता. यानंतर सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह १५ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने ही छापेमारी केली आहे.
मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानी काल सकाळीच सीबीआयचे पथक पोहचले होते. त्यांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येतं असल्याची माहिती समोर आली होती. तपासानंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मनीष सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मनीष सिसोदियांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश असून त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. दरम्यान, मनिष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत सीबीआयच्या कारवाईचा निषेध केला.