काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अधीर रंजन चौधरी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील डिंडोरी येथे अधीर रंजन चौधरी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाने केली आहे.
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्यामुळे काल लोकसभेमध्ये गोंधळ उडाला होता. काल संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींवर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका केली आहे.
द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला होता. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर सोनिया गांधी यांनी चौधरी यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून जेव्हापासून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हापासून त्या काँग्रेस पक्षाच्या द्वेषाची आणि उपहासाची लक्ष्य झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांना कठपुतळी असे देखील संबोधले आहे. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदाला शोभेशा आहेत, हे सत्य अजून काँग्रेसला स्विकारता आलेले नाही, अशी घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केली आहे.