अखेर उस्मानी विरोधात देशद्रोहाचा एफआयआर…पण उत्तर प्रदेशात

अखेर उस्मानी विरोधात देशद्रोहाचा एफआयआर…पण उत्तर प्रदेशात

एल्गार परिषदेतील भाषणात हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात आता देशद्रोहाची कलमे लावून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण एफआयआर महाराष्ट्रात नाही तर योगींच्या उत्तर प्रदेशात दाखल झाला आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत उस्मानी याने भाषण करताना “हिंदू समाज सडलेला आहे” असे अत्यंत विषारी विधान केले होते.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्या भडकाऊ भाषणा विरोधात अनुराज सिंह या उत्तर प्रदेशच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. अनुराज सिंह याने इंटरनेटवर शर्जीलचे भाषण ऐकले आणि त्याविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीचा आधार घेत उत्तर प्रदेश पोलीसांनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआर मध्ये भारतीय दंड संहितेची १२४अ, १५३अ, २९५अ, २९८, आणि आयटी कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. देशद्रोह, समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करणे अशा विविध गुन्ह्यांची कलमे या एफआयआर मध्ये आहेत.

शर्जील उस्मानी याचा इतिहासही असाच वादग्रस्त राहिला आहे. नागरिकत्व कायद्याचा विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात शर्जीलला अटक करण्यात अली होती आणि सध्या तो जामीनावर बाहेर आहे. याच शर्जील उस्मानीने बाबरी ढाचा पुन्हा बांधण्याचे चिथावणीखोर विधान केले होते.

Exit mobile version