पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याने फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या विषयी भारतीय जनता पार्टी पुणेतर्फे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारेच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात एकीकडे कोविडचे थैमान सुरु असतानाच दुसरीकर यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतात. सोशल मीडिया हा या गोष्टींसाठीचे प्रमुख रणांगण बनलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे समर्थक या रणभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करता असतात. पण अनेकदा हे ‘सोशल योद्धे’ टिपण्णी करताना मर्यादा सोडून बोलताना दिसतात. अशाच एका प्रकरणात मर्यादा सोडून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक

शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप

भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!

मोहसीन शेख याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या एका पोस्टमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून वापरला होता. या फोटोत नरेंद्र मोदी यांना मृत्यूची देवता असलेल्या यमाच्या रूपात दाखवले होते. ही पोस्ट भारतीय जनता पार्टीच्या पुणे सोशल मीडिया टीमच्या निदर्शनास आली. त्यानंतर भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात भाजपा पुणे सोशल मीडिया टीमने या संबंधी तक्रार दाखल केली. त्यानंतर पुण्याच्या सायबर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे भाजपाचे सोशल मीडिया संयोजक विनीत वाजपेयी हे या प्रकरणातले मुख्य तक्रारदार आहेत.

याच वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंती योगी आदित्यनाथ यांची बदनामी करणाऱ्या एका इसमावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव जावीर असे त्याचे नाव असून, तो ‘स्वाभिमानी होलार समाज संघटना महाराष्ट्र’ या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे.

Exit mobile version