आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

मुख्यमंत्र्यांवर सरकारी वाहनाचा वैयक्तिक कारणासाठी वापर केल्याचा आरोप

आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

दिल्लीमध्ये निवडणुकीपूर्व तयारी जोरदार सुरू असतानाचं आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि ‘आप’च्या नेत्या आतिशी यांच्या अडचणींमध्ये आवाढ झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध रिटर्निंग ऑफिसरने एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांवर सरकारी वाहनाचा वैयक्तिक कारणासाठी वापर केल्याचा आरोप आहे.

कालकाजी येथे मुख्यमंत्री आतिशी यांच्याशी संबंधित सरकारी वाहनातून निवडणूक संबंधित साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध रिटर्निंग ऑफिसरने एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ७ जानेवारी रोजी दिल्ली निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पीडब्ल्यूडीचे सरकारी वाहन कथितरित्या आपच्या निवडणूक कार्यालयात निवडणूक प्रचार साहित्य पोहोचवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाहन, नोंदणी क्रमांक DL-IL-AL1469 असलेली सरकारी गाडी, निवडणूक-संबंधित कामांसाठी वापरण्यात आली होती.

हे ही वाचा : 

दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली

महाकुंभ मेळाव्यात सहभागी होता येणं हे भाग्यचं!

ऑनर किलिंग रोखण्यासाठी ‘सुरक्षागृह’ निर्णयाची अंमलबजावणी करावी

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार

कालकाजी येथील रहिवासी केएस दुग्गल यांनी गोविंदपुरीच्या एसएचओकडे या प्रकरणाबाबत वेगळी तक्रार दाखल केली. दक्षिण-पूर्व विभागीय कार्यकारी अभियंता संजय कुमार यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश रिटर्निंग अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले. कालकाजी येथून आमदार असलेल्या आतिशी यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. कालकाजी मतदारसंघातून भाजपने दिग्गज नेते आणि माजी खासदार रमेश बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे.

Exit mobile version