केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४ वर्षांसाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्प सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. हे सप्तर्षी आपल्याला अमृतकाळाचे मार्गदर्शन करत आहेत. अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पात रचलेला पाया मजबूत होण्यास मदत होईल. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि समृद्ध भारताचे स्वप्न आहे असे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, समावेशक वाढ, शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विकास , हरित वाढ, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र या ७ गोष्टींना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडायला प्रारंभ केल्यानंतर सभागृहात केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणादरम्यान भारत जोडोच्या घोषणाही देण्यात आल्या.
अर्थमंत्री सीतारमन पुढे म्हणाल्या , आज जग भारताचे कौतुक करत आहे. सर्व देशात भारताचा विकास दर सर्वाधिक आहे. जगात मंदीनंतरही भारताचा विकास दर ७ टक्के आहे. देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे.कोविड आणि युद्ध सारख्या वातावरणातही भारताची अर्थव्यवस्था चांगली राहिली आहे.
हे ही वाचा:
दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित
अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की , आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे. सरकारच्या २०१४ पासूनच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून १.९७ लाख रुपये झाले आहे. या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे.