२४ तासांपेक्षा अधिक काळ स्थानिक अतिथीगृहात ठेवल्यानंतर, सीतापूर पोलिसांनी मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि कमीतकमी १० जणांना अधिकृतपणे अटक केली.
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाताना थांबवण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मालकीची गाडी कथितपणे आंदोलनकर्त्यांवर गेल्याने चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर कथित आंदोलनकर्त्यांनी ४ भाजपा कार्यकर्त्यांना लाठीने मारून त्यांचा जीव घेतला.
प्रियंका गांधींव्यतिरिक्त, अटक करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुडा, यूपी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि पक्षाचे एमएलसी दीपक सिंह यांचा समावेश आहे. सीआरपीसीच्या कलम १५१ अंतर्गत या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
“एकूण ११ जणांना आम्ही अटक केली आहे. सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास प्रियांका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना त्यांना थांबवण्यात आले. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तिथे जाऊ नका, कारण तिथली परिस्थिती गंभीर आहे. कलम १४४ (जमावबंदी) लागू आहे. त्यांनी आमचे ऐकले नाही आणि आम्हाला त्यांना एका स्थानिक अतिथीगृहात घेऊन जावे लागले.
आदल्या दिवशी प्रियांका गांधींनी लखनउ दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक व्हिडिओ निवेदन जारी केले आणि विचारले की त्यांनी लखीमपूर घटनेचा कथित व्हिडिओ पाहिला आहे का? त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ प्ले केला, जो दर्शवितो की महिंद्रा थार मागून येत आहे आणि रस्त्यावरून चालणाऱ्या निदर्शकांच्या गटावर धावत आहे.
हे ही वाचा:
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी आंदोलनकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना लाठीने मारून त्यांची हत्या करतानाच व्हिडिओ मात्र शेअर केला नाही. त्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांनी मारून मारून ड्रायव्हरकडून वदवून घेण्याचा प्रयत्न केला की, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी गाडी आंदोलकांवर घालायला सांगितली होती. परंतु त्या ड्रायव्हरने शेवटपर्यंत तशी खोटी कबुली दिली नाही. दुर्दैवाने या मारहाणीत त्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला.