ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) प्रमुख आणि आसाममधील लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदूंबद्दल केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. हिंदू महिलांनी मुसलमानांसारखं लवकर लग्न करुन जास्त मुलांना जन्म द्यावा असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. एआययूडीएफ प्रमुख अजमल यांनी माफीनामा जारी केला आहे की त्यांना कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
“कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या वक्तव्याचा मला मनापासून खेद वाटतो. मी एक ज्येस्ट नेता असल्यामुळे मला अशी टिप्पणी करायला नको होती. माझ्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची मी माफी मागतो. या विधानाची मला लाज वाटते. सरकारने अल्पसंख्याकांना न्याय द्यावा आणि त्यांना शिक्षण आणि रोजगार द्यावा “, असे अजमल म्हणाले. अजमलचे वादग्रस्त विधान हे गुजरातच्या निवडणुका लक्षात घेऊन राजकीयदृष्ट्या प्रेरित चाल असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी केवळ हिंदीत बोलले, आसामी किंवा बंगाली भाषेत नाही आणि त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची खिल्ली उडवली.
हे ही वाचा :
‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय
आसामचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री जयंता मल्लबरुआ म्हणाले, “अजमल हा राजकीय दहशतवादी आहे. ‘मुस्लिम फॉर्म्युला’वर त्याची अलीकडची अनावश्यक टिप्पणी अत्यंत घृणास्पद आणि भयानक आहे. आसामी लोक आपल्या राज्यात अशा प्रकारची मानसिकता कधीही वाढू देणार नाहीत.” भाजपचे आमदार दिगंत कलिता यांनी मुस्लिम समाजाला अजमलच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आणि असे भाष्य करणारे लोक “सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या बहिष्कृत” असले पाहिजेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते देबब्रता सैकिया म्हणाले की, अजमलचे विधान महिलांबद्दल अत्यंत अपमानास्पद आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने मुस्लिम समाजाला अजमलकडून ‘मौलाना’ पदवी मागे घेण्यास सांगितले असतानाही, विरोधी पक्षांनी अजमल यांच्या या वाक्याचे खापरही भाजपावरच फोडले आहे. हा भाजपाच्या रणनीतीचा भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे.