30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरराजकारणकेरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन अबूबक्कर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला

Google News Follow

Related

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन अबूबक्कर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या केरळ युनिटचे सदस्य होते आणि गेल्या काही महिन्यात त्यांचे केरळ भाजपच्या नेतृत्वाशी संबंध बिघडले होते. अलिकडच्या आठवड्यात भाजपा सोडणारे अबूबक्कर हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील तिसरे व्यक्ती ठरले आहेत.

फेसबुकवर घेऊन अबूबक्कर यांनी जाहीर केले की त्यांनी पक्ष सोडला आहे आणि केरळ भाजपचे प्रमुख के सुरेंद्रन यांना ईमेल ने राजीनामा पाठवला. मात्र, अबूबक्कर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली निष्ठा जाहीर केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच पाठिंबा देत राहीन, असेही ते म्हणाले. रामसिंहन यांनी असेही सांगितले की त्यांनी राजीनामा देऊन बरेच दिवस झाले होते, परंतु ते तो आता जाहीर करत आहेत.

भाजपमधून राजीनामा देण्याची घोषणा करताना अबूबक्कर म्हणाले की, ते आता कोणत्याही राजकीय पक्षाचे गुलाम नाहीत. केरळ भाजपचे नेतृत्व कलाकारांना योग्य न्याय देत नसल्याचा आरोप रामसिंहन यांनी यापूर्वी केला होता. “निवडणुकीत कलाकार हे शोपीस नसतात. कलाकार जगाला पुढे घेऊन जातात हे पक्षाला कळायला हवे,” असे ते म्हणाले होते. केरळ भाजपमधील समस्यांची राष्ट्रीय नेतृत्वाला जाणीव असल्याचेही ते म्हणाले.

रामसिम्हन अबूबक्कर हे मल्याळम चित्रपट बनवणारे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म अली अकबर झाला, परंतु २०२१ मध्ये त्यांनी आपल्या पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी रामसिंहन हे नाव धारण केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूच्या वृत्तावर काहींनी दिलेल्या अनादरपूर्ण प्रतिक्रियांमुळे त्यांना असे करण्यास प्रवृत्त केले, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

गुजरात दंगल : मिडीयाच्या दबावात हिंदूना गोवले

बस थांब्याला दिले ‘बांगलादेश’ नाव!

संगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

उल्लेखनीय म्हणजे, प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक राजसेनन आणि ज्येष्ठ मल्याळम अभिनेते भीमन रघु यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला आणि सीपीआय(एम) मध्ये प्रवेश केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा