‘समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’

‘समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’

आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे मुस्लिम असल्याचा खोडसाळ दावा त्यांनी केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कुर्ला पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रात आमदार भातखळकर यांनी लिहिले आहे की, सध्याच्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात ही तक्रार आहे. सकाळी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करून तो समीर वानखेडे यांचा जन्मतारखेचा दाखला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा दाखला बनावट आहे. वानखेडे हे मुस्लिम आहेत, हिंदू नाहीत हे दाखविण्याचा मलिक यांचा प्रयत्न आहे. त्यातून समाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचाच मलिक यांचा हेतू आहे. मंत्री या नात्याने ते बेकायदेशीर अशा कृत्यात सामील असल्याचे दिसते. तो एक गुन्हा आहे.

 

हे ही वाचा:

सत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका?

आर्यन खानप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर भाई जगताप यांनी उपस्थित केली शंका?

समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत!

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

 

आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, मलिक हे धर्माधर्मांत तेढ निर्माण करत असून समाजातही अशांतता माजवत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि ड्रग्स माफियांची पोलखोल करणाऱ्या एका केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याला ते लक्ष्य करत आहेत. मलिक हे आरोप का करत आहेत, हे त्यांनाच ठाऊक. पण बनावट जन्मतारखेचा दाखला सोशल मीडियावर टाकणे आणि समाजात तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयर दाखल करावा, कायद्याप्रमाणे त्यांच्यावर यथोचित कारवाई करावी.

 

Exit mobile version