25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणआणि काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी काढला पळ

आणि काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी काढला पळ

पत्रकार नाविका कुमार यांचे प्रश्न ठरले अडचणीचे

Google News Follow

Related

काश्मिरमध्ये १९८९-९० मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या व हिंदूंच्या हत्याकांडाबद्दल काही प्रश्न विचारल्यानंतर काश्मिरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एका वाहिनीवरून पळ काढला. नवभारत या वाहिनीवर नाविका कुमार यांनी अब्दुल्ला यांना काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर अब्दुल्ला यांनी उत्तरे न देताच काढता पाय घेतला.

टाइम्स नाऊ नवभारतवर नाविका कुमार यांनी फारुख अब्दुल्लांची मुलाखत घेतली. त्यात वेगवेगळ्या प्रश्नांवर अब्दुल्ला यांच्याकडून उत्तरे मिळतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण अब्दुल्ला यांना काही प्रश्न बोचले आणि त्यांनी इयरफोन भिरकावून देत पळ काढला.

नाविका कुमार यांनी पहिला प्रश्न विचारला की, काश्मिरची स्थिती कशी आहे सध्या. त्यावर अब्दुल्ला म्हणाले की, वातावरण छान आहे. कधी निवडणुका होणार याची प्रतीक्षा आहे.

नाविका कुमार म्हणाल्या की, काश्मिरमध्ये हिंदूंना मारण्यात आले होते, त्यांना मारणारे लष्कर ऐ तोयबाचे अतिरेकी होते. याचसंदर्भात हायकोर्टच्या निर्णयावर खुश आहात का? त्यावर अब्दुल्ला म्हणाले की, हा खुशीचा प्रश्न नाही. न्यायाचा आहे. हिंदूही मारले गेले आणि मुस्लिमही मारले गेले. माझ्या पार्टीचे मंत्री आणि आमदाराही मारले गेले. त्यांनाही न्याय हवाय. त्यांच्या कुटुंबियांना न्याय हवाय. सगळे जे मारले गेले त्यांचाही विचार केला असता न्यायालयाने तर बरे वाटले असते.

काश्मिरी हिंदूंची चर्चा झाली याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे का, या नाविका यांच्या प्रश्नावर अब्दुल्ला वैतागले. ते म्हणाले की, फक्त काश्मिरी हिंदूंबाबत बोलणे योग्य नाही. एकाच वर्गातील लोकांची चर्चा कशाला. इतर लोक काश्मिरी नाहीत का? त्यावर नाविका म्हणाल्या की, काश्मिरी पंडितांना तिथून हाकलण्यात आले, त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे काश्मिरी हिंदूची चर्चा झाली तर त्यात वावगे काय? यावर अब्दुल्ला त्रोटक उत्तर देत म्हणाले की, मला माहीत नाही. दिल्लीच्या सरकारला विचारा.

हे ही वाचा:

आगामी सणांमध्ये तुम्ही ‘ही’ उत्पादने भेट द्या

गणेशोत्सवासाठी भाजपाकडून चाकरमान्यांना ५०० बसेस

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

राहुल गांधींना सुनावत माजी खासदार एम. ए. खान यांचा काँग्रेसला रामराम

 

तुमचे काही याच्याशी देणेघेणे नाही का, या प्रश्नावर अब्दुल्ला म्हणाले की, कोर्टाने न्याय दिलाय. मग यावर तुम्ही का प्रश्न का विचारता? आम्ही तर म्हणतो की, काश्मिरी हिंदूंना आणा परत. त्यावर नाविका म्हणाल्या की, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच त्यांना काश्मिरबाहेर हाकलण्यात आले. त्यावर रागावून अब्दुल्ला म्हणाले की, कोण म्हणतंय की हे मी केलं. मी बंदूक कुठे उचलली. जे बाहेरून आले त्यांनी के कृत्य केले.

त्यावर नाविका म्हणाल्या की, पण तुम्ही या अतिरेक्यांबद्दल बोलण्याऐवजी त्यांच्याशी चर्चेच्या मार्गाने तोडगा काढा असे म्हणता. त्यावर अब्दुल्ला म्हणाल की, तुम्ही वायरची मुलाखत ऐकली का काश्मिरचे आयुक्त सभरवाल यांची त्यांची मुलाखत ऐका.

अब्दुल्लांनी नंतर नाविका यांना सांगितले की, तुम्ही मला जर असे प्रश्न विचारत असाल तर मी मुलाखतीतून निघून जाईन. हिंदू आमचे भाऊबंद होते, आम्ही त्यांच्यासोबतच वाढलो, त्यांच्यासोबतच आमचे आयुष्य जगलो.

नाविका म्हणाल्या की, इतिहास तुम्हाला विचारतो की, तीन हिंदू टपलू, गंजू, जर्नालिस्ट प्रेमनाथ भट यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तेव्हा १९८९मध्ये मुख्यमंत्री होतात.

त्यावर अब्दुल्ला खवळले. तुमची मुलाखत कशासाठी आहे. मला तुम्हाला मुलाखत द्यायची नाही. तुम्ही भाजपाच्या आहात.

त्यावर नाविका शेवटी म्हणाल्या की, आम्ही प्रयत्न केले की काही उत्तरे मिळतील. दीड प्रश्नाचे उत्तरही ते देऊ शकले नाहीत. काश्मीरच्या विषयावर ते बोलायला तयार नाहीत. त्यांना राग येतो. पण जे वर्षानुवर्षे हे भोगत आहेत त्यांचे दुःख जाणून घ्यायला ते तयार नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा