शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड होणारच!

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड होणारच!

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकरी ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या रॅलीला परवानगी दिल्याचा दावा शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे. या परेडचा मार्ग कोणता असावा यावर शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलीस यांच्यात सामंजस्याने निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याचा विरोधात गेले अनेक दिवस आंदोलंन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या ११ फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही. याच आंदोलनांचा एक भाग म्हणून शेतकरी २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती आणि आता या परेडला पोलिसांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात येत आहे.

१८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने असे म्हंटले होते की ट्रॅक्टर परेड हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून या विषयी योग्य तो निर्णय घ्यायचा संपूर्ण अधिकार दिल्ली पोलिसांना आहे. दिल्ली पोलिसांनी या बाबतीत निर्णय घेत असताना ट्रॅक्टर रॅलीसाठी ६० किलोमीटरच्या रस्त्याला परवानगी दिली असून ते सिंघु आणि टिकरी बॉर्डर्सवरचे बॅरिकेट्स हटवणार आहेत.

स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी या संबंधीची माहिती पत्रकार परिषदेत सांगितली आहे. प्रजासत्ताक दिनी ‘किसान गणतंत्र परेड’ निघणार आहे. ही ऐतिहासिक परेड शांततापूर्ण असेल असेही यादव यांनी सांगितले आहे.

Exit mobile version