उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी राज्यातील शेतकरी आत्महत्यांसाठी मागील सरकारची धोरणे जबाबदार धरली आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त उत्तरप्रदेश मध्ये आयोजित केलेल्या ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.

आदित्यनाथ म्हणाले की, भारताच्या समृद्धीचा मार्ग कृषी क्षेत्रातूनच आहे, त्यामुळे भाजप सरकार शेती व्यवसाय विकसित व्हावा याकडे लक्ष देत आहे. आधीच्या सरकारच्या शेतकरी विरोधी दृष्टिकोन आणि अवैज्ञानिक धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. मात्र, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. नरेंद्र मोदी सरकारची शेतीविषयक धोरणे अचूक आहेत.

चरणसिंग यांचे स्मरण करून आदित्यनाथ म्हणाले की, भाजप सरकार राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर अनेक कल्याणकारी उपायांसह माजी शेतकरी नेत्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. केंद्र सरकारने १९६७ मध्ये देशात किमान आधारभूत किंमत ( एमएसपी ) लागू केली असली तरी, त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केवळ मोदी सरकारने केली.

हे ही वाचा:

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट

पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!

आणखी एक मुंडे आता राजकारणात उतरणार!

 

आदित्यनाथ असेही म्हणाले की, त्यांच्या सरकारने शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील मध्यस्थांची भूमिका काढून टाकली त्यामुळे सरकार थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहे. आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतीमध्ये घातक रसायनांच्या वापरावर चिंता व्यक्त केली. त्यावर त्यांनी उपाय म्हणून पंतप्रधानाच्या उपायाचे समर्थन केले. आणि या उपायांमुळे शेतीतील उत्पादकता देखील वाढेल. असेही ते म्हणाले.

Exit mobile version