चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?

चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?

सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुक्रवार, ३ डिसेंबर रोजी अभिनेत्री कंगना रानौत हीचा ताफा पंजाबमध्ये अडवण्यात आला. स्वतःला शेतकरी सांगणाऱ्या नागरिकांचा जमाव कंगनाच्या ताफ्यावर चालून आला आणि त्यांनी कंगनाचा ताफा अडवला. कंगननाने हा सारा प्रकार तिच्या समाज माध्यमांवरील खात्यांवर फोटो आणि व्हिडीओ स्वरूपात टाकला आहे.

अभिनेत्री कंगना रानौत ही काल हिमाचल प्रदेश येथून पंजाबमध्ये दाखल झाली. यावेळी एक जमाव तिच्या ताफ्यावर चालून आला. श्री किरतपुर साहेब येथील बुंगा साहेब परिसरात ही घटना घडली. या जमावाने कंगनाच्या गाडीला सर्व बाजूंनी घेरले. यामुळे चंदीगड – उना महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमही पहायला मिळाला. पण कंगनाने या जमावाशी संवाद साधत परिस्थिती शांत केली. या नंतर हा जमाव परतला असून कंगनाच्या ताफ्याला पुढील प्रवासासाठी वाट मोकळी करून देण्यात आली.

हे ही वाचा:

‘पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे’

पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या

‘वाघ’च म्हणतो बंद करा मांसाहार!

उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी

माफी न मागण्यावर कंगना ठाम
दरम्यान या सर्व प्रकरणात कंगना रानौत हीच्या माफीची मागणी घेऊन हे शेतकरी आले असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात कंगनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले होते. पण आपण शेतकरी विरोधी नाहोमी आणि आपण कोणतेही चुकीचे विधान केलेले नसून आपण माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे कंगनाने स्पष्ट केले. तिने शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चेतून विषय मिटवला. त्यामुळे या प्रकणात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आलेले सर्व शेतकरी हे आपपल्या ठिकाणी परतले तर कंगनाचा ताफाही पुढे निघून गेला. या वर प्रतिक्रिया देताना ‘प्रेमाने सर्व काही जिंकता येते’ असे म्हटले आहे.

Exit mobile version