शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी चंदीगढमध्ये शनिवारी हजारो ‘शेतकऱ्यांनी’ आंदोलन करून कोरोनाच्या सर्व नियमांचा भंग करत प्रचंड गोंधळ घातला.
यासंदर्भात आलेल्या बातम्यांनु चंदीगढहून पंजाब आणि हरयाणाकडे या आंदोलकांनी कूच केले होते. आपले निवेदन त्यांना त्या राज्यांच्या राज्यपालांना द्यायचे होते. केंद्र सरकारने शेतकरी कायद्यात केलेल्या सुधारणा रद्द कराव्यात, अशी मागणी या आंदोलकांची आहे. गेले सात महिने हे आंदोलन सुरू आहे. हे निवेदन सादर करण्यासाठी या आंदोलकांनी पंजाब आणि हरयाणाच्या राजभवनच्या दिशेने कूच केले. त्यांनी कोरोनाच्या सर्व निर्बंधांचे उल्लंघन केले.
हे ही वाचा:
तौक्तेग्रस्तांच्या तोंडाला ठाकरे सरकारने पुसली पाने
महाराष्ट्राच्या ‘ड्रॅगन’चे दुबईला उड्डाण
कुंदन, पालांडे यांनी बारमालक, बदल्यांसाठी कोट्यवधी उकळले
ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे षडयंत्र
संयुक्त किसान मोर्चाने प्रत्येक महिन्यातील २६ तारीख ही आंदोलन दिवस म्हणून जाहीर केला आहे. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांनी तयार केलेले कुंपण हटविले आणि राजभवनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आंदोलकांनी कुंपण बाजूला करत आगेकूच केले. एका आंदोलकाने तर पाण्याचे फवारे मारणाऱ्या गाडीवर चढून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकानी रस्ते अडविल्यामुळे एक रुग्णवाहिका अडकून पडली. चंदीगढ पंचकुला मार्गावर एका आजारी रुग्णाला नेणारी रुग्णवाहिका आंदोलकांमुळे अडकली. तेव्हा चंदिगढ पोलिसांनी या रुग्णवाहिकेला वेगळ्या रस्त्याने जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.