25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरक्राईमनामा"शेतकरी" आंदोलकांनी केली तरुणाची हत्या, मृत्यूचे केले चित्रीकरण

“शेतकरी” आंदोलकांनी केली तरुणाची हत्या, मृत्यूचे केले चित्रीकरण

Google News Follow

Related

आज सकाळी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवरील तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाचे डावे मनगट कापलेले होते ज्यामुळे जमिनीवर भरपूर रक्त सांडले होते. हा मृतदेह पोलिसांच्या बॅरिकेडला बांधलेला आढळला.

“आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास, ज्या ठिकाणी तथाकथित शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. तिथे हात, पाय बांधून मनगट कापलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह  लटकलेला आढळला. या तरुणाच्या हत्येकरता कोण जबाबदार आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.” असे डीएसपी हंसराज यांनी सांगितले.

“हत्येचे व्हिडिओ हा तपासाचा विषय आहे, या विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. दरम्यान,आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण ३५ (किंवा ३६) वर्षांचा होता, ज्याचे नाव लखबीर सिंग असे होते. हा तरुण पंजाबच्या ताम तरण जिल्ह्यातील होता. तो हरनाम सिंह नावाच्या व्यक्तीचा दत्तक घेतलेला मुलगा होता जो मजूरी करत होता. त्याच्या पश्चात एक बहीण, पत्नी आणि तीन मुली आहेत, त्यापैकी सर्वात मोठी मुलगी फक्त १२ वर्षांची आहे.

सुरुवातीच्या अहवालात म्हटले आहे की हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कुंडली येथे घडलेल्या क्रूर आणि त्रासदायक हत्येसाठी निहंग शीख गट दोषी आहे.

एक अत्यंत खळबळजनक आणि भयावह व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये निहंगांचा एक गट लखबीर सिंग यांच्या मनगट कापलेल्या शरीरावर उभा आहे. अपार वेदनांमुळे त्यांचे डोळे वेदनांनी चमकले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत आहे.

निहांग, ज्यांपैकी काही भाले घेऊन आहेत, त्यांना त्यांचे नाव सांगण्याची मागणी करताना ऐकता येऊ शकते. व्हिडिओमधील कोणीही त्याला मदत करण्यासाठी कोणतीही हालचाल करताना दिसत नाही.

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण

सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच

भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!

आणखी एका व्हिडीओमध्ये दोरीच्या सहाय्याने शरीर उलटे अडकलेले दिसते आणि जमिनीवर रक्त सांडलेले दिसत आहे. अजून एका व्हिडिओमध्ये लखबीर सिंह जमिनीवर पडलेला दिसत आहे आणि इतर लोकं त्यांच्या मोबाईल फोनवर त्याच्या मृत्यूच्या क्षणांचे चित्रीकरण करताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा