दिल्लीतील आंदोलन हिंसक वळणावर

दिल्लीतील आंदोलन हिंसक वळणावर

एकीकडे दिल्लीच्या राजपथावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे संचाल सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मात्र नियंत्रणाबाहेर गेली आहे. अखेर दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध कारण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘किसान गणतंत्र परेड’ चे आयोजन केले आहे. ही परेड शांततापूर्ण मार्गाने होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या परेडला परवानगी दिली होती. पण आता हे आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे. पोलिसांनी ठरवून दिलेल्या परेडच्या मार्गाव्यतिरिक्त दुसरा मार्ग वापरण्यासाठी हे शेतकरी प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

दिल्लीत निरनिराळ्या ठिकाणी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. मुकाबरा चौक येथे आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांच्या गाडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि बॅरिकेड्स हटवण्याच्याही प्रयत्नात होते. संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथेही पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली.

त्यानंतर नाईलाजास्तव पोलिसांना अश्रुधुराचा वापर करणे भाग पडले आहे. संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे आंदोलक पाण्याच्या टॅंकरवर चढलेले पाहायला मिळाले. तर कर्नाल बायपास इथे पोलीस बॅरिकेड्स वर दंडुके आणि कुऱ्हाडी सारख्या शस्त्रांनी हल्ला करून ते तोडण्याचा प्रयत्न आक्रमक आंदोलकांनी केला आहे.

दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर प्रणव नगर जवळही आंदोलक पोलीस बॅरिकेड्स हटवून जाताना दिसून आले.

आंदोलकांनी मात्र पोलिसांनी आमच्यासोबत ठरवलेला मार्ग वेगळा होता आणि आता आम्हाला वेगळ्या मार्गाने जायला सांगत आहेत असा दावा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या विषयीचे वृत्तांकन केले आहे. 

Exit mobile version