काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच

काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच

राज्यात सद्ध्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पण अशातच देगलूर मधील शेतकरी काँग्रेसच्या सभामंडपा बाहेर बसून आम्ही भाजपलाच मतदान करणार असल्याचे सांगताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांना या संदर्भातील प्रतिक्रिया शेतकरी देताना दिसत आहेत. देगलूर मधले हे व्हिडिओ समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झाले आहेत.

देगलूर बिलोली मतदार संघात नुकतीच काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते आणि महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रचार सभा पार पडली. या सभेच्या मंडपा बाहेर काही शेतकरी उपस्थित होते. यापैकी एका शेतकऱ्याने नांदेड मधील स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये शेतकरी ठाकरे सरकारवर खूप मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसत आहे. राज्यात अतिवृष्टी झाली यामध्ये तूर, मूग, सोयाबीन अशी महत्त्वाची पिके वाया गेली. पण ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत मिळाली, ना विम्याचे पैसे मिळाले असेही शेतकरी सांगताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

तर दुसरीकडे मोदी सरकारच्या कामगिरीवर हे शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहेत. “सत्तर वर्षात काँग्रेसने शेतकऱ्याला काही दिले नाही पण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे भले केले. ते चांगलं काम करतात म्हणूनच त्यांच्यावर महाविकास आघाडीतील पक्षाचे लोक टीका करत आहेत” असे हे शेतकरी सांगताना दिसत आहेत.

Exit mobile version