ऊसतोडणीचा हंगाम संपत आला तरी, एका कुटुंबाचा कारखान्याने ऊस तोडून नेला नाही. खरीप जवळ आल्यामुळे शेत पुढच्या पिकासाठी मोकळे करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे कारखान्याची वाट न पाहता कुटुंबासोबत शेतकऱ्याने ऊसतोडणी केली आहे. बँकेकडून घेतलेले पीक कर्ज फेडण्यासाठी अख्ख कुटुंब लहान मुलासह भर उन्हात राबले.
लहान मुलाचे खेळण्याचे वय आहे. त्यांच्या हातात कोयता दिला. माझे ४० वर्षांचे वय आहे, आयुष्यभर मजुरी केली. मात्र उसाची तोडणी प्रथमच करतोय. अशी वेळ येईल, याची कल्पना नव्हती, असे नवनाथ आसने म्हणाले आहेत.
नवनाथ चंद्रभान आसने, त्यांची पत्नी अनिता तसेच चुलत भाऊ संदीप आसने व त्यांची पत्नी कविता हे चौघेजण लहान मुलांसह ऊस तोडणी केली आहे. जेमतेम प्रत्येक दीड एकर शेतीवाडी असणाऱ्या आसने बंधूंचा सव्वा दोन एकर खोडवा शेतात होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या शेतातील ऊसाची तोडणी झाली होती. मात्र यंदा मे महिन्याचा अखेर आला तरीही ऊसतोड होत नव्हती. म्हणून मग आपणच ऊस तोडून पोहोच करू, असे दोघा भावांनी ठरवले.
श्रीरामपूरमधील संपूर्ण आसने कुटुंबाने, कुटुंबातील लहान मुलांसकट; आपल्या जेमतेम २.२५ एकर वरील उसाची तोडणी, कारखान्याची तोड न मिळाल्यामुळे स्वतः केली. एवढे बेसुमार कष्ट उपसूनही बँकेचे १ लाखाचे कर्ज फिटले जाणार नाही.
शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीच्या बाता करणारे ठाकरे सरकार कुठे आहे? pic.twitter.com/Up5ij9ADGk— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 25, 2022
एक लाखाचे पीक कर्ज फेडण्यासाठी या कुटुंबाला शेतात ऊसतोड करावी लागली होती. त्या शेतकरी कुटुंबावर गावातील राष्ट्रीयकृत बँकेचे एक लाख कर्ज होते. खोडवा ५० ते ६० टन वजन देईल अशी अपेक्षा होती. आता मात्र अवघ्या ४० टनाची अपेक्षा आहे. तोडणीसाठी मजुरीवर २५ ते ३० हजार रुपये खर्च झालेला आहे. त्यामुळे उसातून कर्जफेड होणार नाही, असे संदीप आसने यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पंजाब मंत्रिमंडळातून हकालपट्टी
यावर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, श्रीरामपूरमधील संपूर्ण आसने कुटुंबाने, कुटुंबातील लहान मुलांसकट; आपल्या जेमतेम २.२५ एकर वरील उसाची तोडणी, कारखान्याची तोड न मिळाल्यामुळे स्वतः केली. एवढे बेसुमार कष्ट उपसूनही बँकेचे १ लाखाचे कर्ज फिटले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीच्या बाता करणारे ठाकरे सरकार कुठे आहे? अशी टीका भातखळकर यांनी दिली आहे.