प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आता शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा?

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आता शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा?

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाची शीर्ष संघटना- संयुक्त किसान मोर्चाने आता संसदेवरच मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच हा मोर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांविरूद्ध कामगार, महिला, दलित-आदिवासी-बहुजन, बेरोजगार अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घ्यावा असेही संचुक्त किसान मोर्चा तर्फे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी हा मोर्चा संपूर्ण शांततेच होईल असेही सांगण्यात आले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार, या आंदोलनासाठी येणारे शेतकरी स्वतःच्या वाहनातून दिल्लीच्या सीमेपर्यंत येतील आणि त्यानंतर चालत, संसदेपर्यंत मोर्चा काढला जाईल. या मोर्चाची नेमकी तारिख लवकरच घोषित केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

ममता, सुवेंदूची आज परिक्षा

प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसाचाराचे उदाहरण समोर असल्याने यावेळी खुद्द शेतकरी नेत्यांकडूनच एक समिती तयार करण्यात येणार आहे. जर या मोर्चात काही हिंसाचार झाल्याने पोलिसांना आंदोलकांवर काही कारवाई करावी लागली, तर या समितीचे सदस्य आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांची मदत करतील.

आणखी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना गुरूनाम सिंग चाडूनी यांनी म्हटले हे की, “आम्ही जर मोर्चात हिंसाचार झालाच तर काय करायचे यासाठी एका समितीची स्थापना करणार आहोत.” त्याबरोबरच “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, एसकेएम कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करते. त्यामुळे आंदोलकांना कळेल की त्यांच्याकडून जर कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचे नुकसान झाले तर त्यांना दंड आकारण्यात येईल.”

संयुक्त किसान मोर्चा तर्फे, उन्हाळ्यात आंदोलनासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यामध्ये १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून एक दिवसासाठी कुंडली-मानेसर-पलवल महामार्ग रोखून धरणे, ६ मे रोजी या आंदोलनात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य कार्यक्रम, १ मे रोजी कामगार दिनानिमित्त एक कार्यक्रम आणि १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त आणखी एक कार्यक्रम अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version