‘शेतकरी’ पेरणी सोडून ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करणार?

‘शेतकरी’ पेरणी सोडून ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करणार?

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाविषयी नवीन धमकी दिली आहे. ऑक्टोबर पर्यंत शेतकरी आंदोलन संपणार नाही अशी धमकी राकेश टिकैत यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसमोर भाषण करत असताना, “कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आपण घरी जाणार नाही. ही आपली घोषणा आहे. जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर हे आंदोलन सुरूच राहील. ऑक्टोबर पर्यंत आंदोलन सुरु राहील. आंदोलन लवकर संपणार नाही.” असे टिकैत म्हणाले.

शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय झालेले असल्याचा आरोप पत्रकारांनी केल्यावर टिकैत यांनी असे सांगितले की, “विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यात काहीच गैर नाही. पण त्यांनी या विषयावर राजकारण करू नये.”

गेले अनेक दिवस, आठवडे आणि महिने काँग्रेस, आप आणि डावे पक्ष या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील टिकैत यांची भेट घेऊन आले. ज्याप्रकारे २०२० मध्ये शाहीन बागच्या आंदोलनस्थळावर अनेक राजकीय नेत्यांनी जाऊन मोदी सरकारवर टीका केली होती, त्याचप्रकारे २०२१ मध्ये या शेतकरी आंदोलनाच्या स्थळी जाऊन सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत.

शेतकरी आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील हे सांगून, या प्रकरणी तोडगा काढायला टिकैत तयार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

Exit mobile version