देशात लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा शनिवारी पार पडला. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून याकडे सर्वांचेचं लक्ष आहे. १६ जूनला १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपत असून त्यापूर्वीच नवीन सरकार स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच ५ जून रोजी आताच्या केंद्रीय मंत्रिमंडळासाठी फेअरवेल डिनर आयोजित करण्यात आले आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केंद्रीय मंत्रिमंडळाला फेअरवेल डिनर देणार आहेत. याचे आयोजन ५ जून रोजी रात्री ८ वाजता केले जाणार आहे. प्रत्येक लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर राष्ट्रपतींकडून मंत्रिमंडळाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात येतो. यावेळी ५ जूनला याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘लोकमत’ने दिली आहे.
हे ही वाचा:
रविवारी केजरीवाल जाणार पुन्हा तुरुंगात
पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली
‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा शनिवारी पार पडत आहे. यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता असणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत. यापैकी अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांचे निकाल २ जूनला जाहीर होणार आहेत. तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे निकाल ४ जूनला सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांसह जाहीर होणार आहेत.