पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

तळागाळातील नेता ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास करणारे राम नाथ कोविंद हे समाजातील समतावाद आणि सर्वसमावेशकतेचे पुरस्कर्ते आहेत. २५ जुलै २०१७ रोजी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारे कोविंद त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर रविवारी राष्ट्रपती भवनातून निरोप घेतील. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीतील हॉटेल अशोका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फेअरवेल डिनर देण्यात येणार आहे. या प्रसंगी  मंत्री, काही मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्नेहभोजन समारंभ सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. तेही या फेअरवेल डिनरला उपस्थित राहणार आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे- फडणवीस दिल्लीत जात असले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी किंवा सोमवारी होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे- फडणवीस सरकारचा ३० जून रोजी शपथविधी झाला.

हे ही वाचा:

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

दिल्लीच्या संसद भवनातही निराेप समारंभ

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी २३ जुलै रोजी संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित केला आहे. यादरम्यान राष्ट्रपती कोविंद यांना ‘स्मृतीचिन्ह’ आणि संसद सदस्यांच्या स्वाक्षरीचे ‘स्वाक्षरी पुस्तक’ देखील प्रदान केले करण्यात येईल. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमाचा भाग असतील.

Exit mobile version