25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणभातखळकरांनी ऑफर नाकारल्यामुळे राज ठाकरे यांची चरफड

भातखळकरांनी ऑफर नाकारल्यामुळे राज ठाकरे यांची चरफड

Google News Follow

Related

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले अनेक दावे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट नाकारल्याचा दावा ज्यांच्याबाबत केला त्या सदाशिव लोखंडे यांनी २००९ मध्ये मनसेच्या तिकीटावरच कुर्ला येथून निवडणूक लढली होती आणि भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांना राज ठाकरे यांचीच मनसेमध्ये येण्याची ऑफर होती असे उघड झाले आहे.

राज ठाकरे यांनी ‘हे लोखंडे आपल्याकडे तिकीट मागायला आले होते आणि त्यांना आपण असे करू नका, आहे त्याच पक्षात राहा’, असा सल्ला दिल्याचा दावा केला होता. हेच सदाशिव लोखंडे मनसेतर्फे २००९च्या निवडणुकीत उभे राहिले होते. लोखंडेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे, शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आणि रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर असे उमेदवार उभे राहिले होते. लोखंडे यांच्याबाबत राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे सफेद झूठ होते हे स्पष्ट झाले. अतुल भातखळकर यांच्याबाबतही त्यांचा दावा फसवा आहे.

हे ही वाचा:

घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा

दुकाने उघडल्यामुळे आला व्यापाऱ्यांच्या जीवात जीव

पिटावर बंदी घाला- अमूलचे पंतप्रधानांना पत्र

बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

२००९ च्या निवडणुकीत भातखळकर यांना तिकीट मिळेल अशी हवा होती. परंतु प्रत्यक्षात जयप्रकाश ठाकूर यांना भाजपाने तिकीट दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भातखळकर यांना मनसेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली, परंतु भातखळकर यांनी ती धुडकावली. तिथून राज ठाकरे आणि अतुल भातखळकर यांचे फाटले. त्यातूनच त्यांनी भातखळकर यांच्यावर तिकीट मागितल्याचा ठपका ठेवून उट्टे काढण्याचा प्रयत्न २०१४ च्या निवडणुकीत केला होता. परंतु आता इतक्या वर्षांनी या शिळ्या कढीला गिरीश कुबेर यांच्यामुळेच उत आला असल्याचे मानले जाते.

छत्रपती संभाजी महाराजांबाबत अनुद्गार काढणाऱ्या कुबेर यांच्या रेनिसन्स स्टेट या पुस्तकाला अतुल भातखळकर यांनी उघड विरोध केला होता. बिनबुडाचे दावे करणाऱ्या या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे दुखावलेल्या कुबेर यांनी त्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा तो मुद्दा वदवून घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एरव्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाबत भरभरून बोलणाऱ्या राज ठाकरे यांनी रेनिसन्स स्टेट या पुस्तकाबाबत मूग गिळून राहणे पसंत केले आहे. परंतु मुलाखतीत केलेल्या बोगस दाव्यांमुळे राज ठाकरे यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा