महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास सुरूवात

महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास सुरूवात

राज्यातील वाढते ऊसाचे पीक लक्षात घेता, यंदा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची तयारी सहकार विभागाने केली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता १५ ऑक्टोबरपासून २०२२-२३ वर्षाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्राचा जगात तिसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.

आज, १९ सेप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बेंद्रे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, खासदार धनंजय महाडीक आदी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

गेल्या हंगामात सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांनी ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी रक्कम देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर आहे. महाराष्ट्रात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरु होणार असल्याने १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे गेल्या हंगामात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अशी माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स

तसेच इथेनॉल निर्मितीमध्येही महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मितीबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

Exit mobile version