29 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामाकवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात

कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळची निवडणूक लढवून बाजी मारली होती. त्यांच्या विजयाची चर्चा देखील झाली होती. मात्र, कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागांमध्ये दुबार मतदान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक १० आणि १६ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक १० मध्ये सात मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे. तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये मयत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणानंतर प्रभाग क्रमांक १० आणि १६ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे. ॲड. अमित शिंदे यांनी माहिती दिली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये शेतकरी विकास आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दूलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केलेली आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये सात मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे. पराभूत उमेदवार शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मयत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मयत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे. ज्या मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र घालून उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईतील बार प्रकरणी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट

मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे

प्रभाग क्रमांक १६ मधील आरपीआयचे उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे यांनी विजयी उमेदवार संजय विठ्ठल वाघमारे व इतर पराभूत उमेदवार यांचे विरुद्ध दाद मागितली आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये तीन मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे. तर तीन व्यक्तींची प्रभाग १६ च्या मतदार यादीमध्ये दोन वेळा नावे आली असून त्यांनी त्या दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे. तसेच चार चुकीची नावे असतानादेखील त्यांच्या नावावर बनावट मतदान झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नानासाहेब वाघमारे यांना विजय घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दोन्ही तक्रारींमध्ये बनावट मतदानाचा सबळ पुरावा हजर केलेला असून निवडणूक निर्णय, अधिकारी, कवठेमहांकाळचे मुख्याधिकारी यांनादेखील पक्षकार केले आहे. आता यावर न्यायालय काय निर्णय देणार  याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा