23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

काँग्रेसनेते भालचंद्र मुणगेकर यांनी मागितली माफी

Google News Follow

Related

काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे खोट्या बातम्या शेअर केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या,’ अशी खोटी पोस्ट ‘एक्स’वर केली होती. पंतप्रधान मोदींकडून नामनिर्देशन पत्र दाखल केले जात असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहभागी होऊन पदाचा अवमान केल्याचा दावा करून मुणगेकर यांनी राष्ट्रपतींना लक्ष्य केले होते. तसेच, याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अशी पोस्ट लिहिताना त्यांनी सोबत एक छायाचित्रही पोस्ट केले. त्यात पंतप्रधान मोदी हे द्रौपदी मुर्मू आणि मोठ्या संख्येने एनडीए नेत्यांसह एका अधिकाऱ्याला नामनिर्देशनपत्र देताना दिसत आहेत. मात्र नंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट केली आणि अन्य कोणीतरी ही पोस्ट केल्याचा दावा केला.

‘नरेंद्र मोदी यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना, भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती असणे, हे निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन आहे. त्यामुळे या पदाचा अवमान झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली पाहिजे,’ असे मुणगेकर यांनी म्हटले आहे.

तथापि, राष्ट्रपती मुर्मू या पंतप्रधान मोदींसोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत होत्या, हा दावा निखालस खोटा आहे. हे छायाचित्र आणि घटना जून २०२२ची आहे. एनडीए नेते त्यांच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हाचे हे छायाचित्र आहे. त्यावेळी काँग्रेसने एनडीएने मुर्मू यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती.

२४ जून २०२२ रोजी पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी दाखल केल्यापासूनची अनेक छायाचित्रे शेअर केली होती, त्यापैकीच एका छायाचित्राचा वापर मुणगेकर यांनी खोटी पोस्ट करण्यासाठी केला. आपला खोटेपणा उघड झाल्यानंतर काँग्रेस नेते मुणगेकर यांनी त्यांच्या हँडलवरून कोणीतरी दुसऱ्याने पोस्ट केल्याचे सांगत याबाबत माफीही मागितली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलमध्ये घुसखोरी केल्याचा दावा केला. “मला नुकतेच माझे ट्विटर खाते सुरू करता आले आहे. माझ्या हँडलवरून कोणीतरी चुकीची माहिती असलेले ट्विट केले होते. मनापासून क्षमस्व,’ असे ट्वीट त्यांनी केले.

हे ही वाचा:

विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा!

गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

‘पाकिस्तान की औकाद नहीं कि भारत के चुनाव में दखल दे सके’

खरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून किंवा इतर कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. प्रत्यक्षात या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियाही सुरू झालेली नाही. वाराणसीमध्ये १ जून रोजी शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोग ७ मे रोजी सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करेल आणि त्यानंतरच उमेदवार वाराणसीसह शेवटच्या टप्प्यातील ५७ मतदारसंघांसाठी अर्ज दाखल करू शकतील. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख, १४ मे रोजी वाराणसीमधून अर्ज दाखल करतील, असे समजते.

राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते असण्यासोबतच मुणगेकर हे अर्थतज्ज्ञ असून त्यांनी यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. ते भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्यही होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा