२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिस प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. या संबंधातच आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकार आणि राजकारण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दाखल केलेल्या या एफआयआर मध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, इंडिया टुडे वाहिनीचे पत्रकार राजदिप सरदेसाई, नॅशनल हेराल्डच्या संपादकीय सल्लागार मृणाल पाण्डेय, कौमी आवाजचे मुख्य संपादक जफर आगा कोमी, कारवा मासिकाचे मुख्य संपादक परेशनाथ, संपादक अनंतनाथ आणि कार्यकारी संपादक विनोद जोस यांच्या नावांचा समावेश आहे.
या सर्व पत्रकारांचा इतिहास कायमच वादग्रस्त राहिला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही यांच्या वादग्रस्त आणि तितक्याच फेकाफेकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकारांची फेकाफेकी, चुकीची माहिती पसरवणे, चुकीचे संदर्भ देऊन मनाच्या कहाण्या रचणे आणि हे सगळं करूनही वैचारिकता, नैतिकता यांचा टेंभा मिरवणे या सगळ्याचा समाचार या व्हिडिओतून घेण्यात आला आहे.
या पत्रकारांसाठी मैदानात उतरलेले एडिटर्स गिल्ड इतर वेळी कुठे असते? याच लोकांच्या समर्थानात कसे लगेच सक्रिय होते? अर्णबच्या अटके विरोधात फार काही बोलताना का दिसत नाही? या सगळ्याचा उलगडा व्हिडिओतून करण्याचा प्रयत्न केला आहे.