पालघर लोकसभा मतदार संघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी असलेले अजय सिंह यांच्या नावाचा वापर करून पालघर मतदार संघातील भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे पत्र व्हाट्सअप्प वर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले होते.मात्र हे पत्र खोटे असून अद्याप या पालघर मधील उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली नाही,कोणीतरी खोडसाळपणा केल्याची तक्रार मंगळवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून उमेदरवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशात राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जवळजवळ जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे, मात्र काही जागेवरून राज्यात वाद असल्यामुळे महाराष्ट्रातील काही मतदार संघात लोकसभा निवडणुकीचे उमेदरवार जाहीर करण्यात आलेले नाही. त्यापैकी पालघर हा एक मतदार संघ असून या मतदार संघात भाजप कडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसताना सोमवारी भाजप चे एक पत्र अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर व्हायरल झाले होते.
हे ही वाचा:
२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’
अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर कारची ट्रकला धडक, १० जण ठार!
मतदानाच्या दिवशी कूचबिहारला भेट देऊ नका!
एकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे
हे पत्र भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी असलेले अजय सिंह यांच्या सही शिक्क्याचे होते, या पत्रात पालघर मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश कृष्णा निकम यांचे नाव घोषित करण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हा प्रकार भाजपचे महाराष्ट्र राज्य आचारसाहिता व विधी प्रमुख असलेले ऍड.अखिलेश चौबे यांच्या लक्षात आले, पालघर मतदार संघात अद्याप भाजप कडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नसताना व्हायरल झालेले पत्र हे बनावट असून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे निर्दशनात आले.
या खोट्या पत्राप्रकरणी ऍडव्होकेट चौबे यांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या पत्राची तक्रार दाखल केली.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्र तयार करणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.