महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा आमदारांचा विषय हा यातील कळीचा मुद्दा असतो. अशातच मंगळवार, १९ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचे एक पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. विधान परिषदेवर नियुक्त होणाऱ्या १२ आमदारांमध्ये समाविष्ट करण्यासाठी सहा नावे या पत्रात लिहिली होती. पण नंतर या प्रकरणात कमालीचा ट्विस्ट आला असून हे पत्र खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या नावे हे फेक पत्र नेमके कोणी पसरवले हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मंगळवारी राज्यपाल भगतसिंहा कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. यामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत होते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांची नावे राज्यपालांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदार बनण्यासाठी ६ नावे पाठवल्याचे या पत्रातून समोर आले होते.
हे ही वाचा:
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
महापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड
कांदिवलीनंतर चेंबूरमध्ये भाजपच्या पोल खोल अभियान रथाची तोडफोड
मराठीहृदयसम्राट ते हिंदुजननायक
महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगली होती. पण ही बातमी व्हायरल झाल्यानंतर राजभवनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. राज्यपालांच्या नावाने फिरणारे ते पत्र फेक असल्याचे सांगितले जात आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे कोणतेही पत्र पाठवले नसून कोणतीही नावे सुचविण्यात आलेली नाहीत असे राजभवनाकडून सांगण्यात येत आहे.
राज्यपालांच्या त्या फेक पत्रात होती ही सहा नावे
वीरभद्रेश करबसप्पा बसवंती. (सामाजिक)
सतीश रामचंद्र घरत (उद्योग)
रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) (राजकीय)
जगन्नाथ शिवाजी पाटील. (सामाजिक)
मोरेश्वर महादू भोंडवे. (राजकीय)
संतोष अशोक नाथ, (सामाजिक)