फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?

फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?

कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांची अचानक समोरासमोर भेट झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यावेळी दोघांनी एकमेकांशी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस आधी पोहोचले होते. लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. इतके दिवस कोणी आले नव्हते, तुम्ही आलात असं स्थानिक फडणवीसांना म्हणाले. त्याच वेळी उद्धव ठाकरेही शाहूपुरी इथे पोहोचले आणि आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते. याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप पाठवला. “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला.  त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर एकत्र पाहणी झाली.

हे ही वाचा:

मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या योजना

सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?

एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?

तालिबानला विनोदाचेही वावडे?

पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दोन्ही नेते एकाच वेळी समोरासमोर आल्याने मीडिया आणि पोलिसांचीसुद्धा तारांबळ उडाली होती.

Exit mobile version