24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

Google News Follow

Related

कालपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली. परंतु या संमेलनाला गालबोट लावण्याचं काम ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे. या संमेलनावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आल्यामुळे तमाम सावरकरप्रेमी दुखावले गेले आहेत. यातलेच एक सावरकरप्रेमी असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हेच कारण देत संमेलनाला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये असले तरी ते ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नाहीत. ट्वीट करुन फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. नाशिकातील संमेलनस्थळाला कुसुमाग्रज आणि वीर सावरकरांच्या नावावरुन झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

“या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.” असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

“केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?” असा सवाल फडणवीसांनी केला आहे. “नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत.” याची आठवणही फडणवीसांनी करून दिली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?

‘पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे’

दरम्यान, फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, नाशिकमध्ये असूनही त्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा