राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी करत आहेत. मात्र, अधिवेशनामध्ये शिंदे- फडणवीस सरकार विरोधकांना सडेतोड उत्तर देताना दिसतं आहे.
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीचा मुद्दा उपस्थित केला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. सभागृहात सुनील प्रभू म्हणाले, विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही आहे. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत.
एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचं कर्ज उभं करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे, असा मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. यावर फडणवीस यांनी सुनील प्रभू यांना थेट मंत्रीपदाची ऑफरचं दिली आहे.
ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती आहे की, आम्ही कधी मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रिमडळाचा विस्तार करु शकतो. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
‘बोम्मईंच्या खात्यावरून ट्विट कोणी केलं लवकरचं कळेल’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मविआचे आंदोलन
‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’
तर मंत्रिमंडळात तुम्हाला संधी हवी आहे का? असा सवालचं फडणवीसांनी सुनील प्रभू यांना केला आहे. कोट्यावधी नाहीतर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो, असंही मिश्कीलपणे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.