‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी अकरा वाजता एक पत्रकार परिषद घेऊन त्यातून फोन टॅपिंगबद्दल खुलासा केला होता. या फोन टॅपिंगमुळे पोलिसांच्या बदल्यांचा धंदा उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. फडणवीसांनी सकाळीच ६.३ जीबीचा डेटा असलेला पेन ड्राईव्ह त्यांनी दाखवला होता. या पेन ड्राईव्हमध्ये फोन टॅपिंगचा सगळा डेटा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

पोलीस गैरव्यवहार करत असल्याची माहिती फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना २०१७ साली सुद्धा सरकारकडे आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तात्काळ ऍक्शन घेतली होती, असेही त्यांनी सांगितले. फडणवीसांनी या सर्व प्रकरणाचा ६.३ जीबीचा डेटा एका पेन ड्राईव्हमधून आणला. हा सर्व डेटा दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सचिन वाझेचे बनावट आधार कार्ड ताब्यात

बंद शाळांसाठी पोषण आहाराचे कंत्राट; महानगरपालिकेचा अजब कारभार

पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे १७ फेब्रुवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आल्याचे सांगितले. तसेच त्याचा पोलिसांकडे रेकॉर्ड असल्याची माहितीही त्यांनी पुरवली. १५ फेब्रुवारीलाच अनिल देशमुख हे खाजगी विमानाने मुंबईला आल्याचेही ते म्हणाले, त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेली माहिती खोटी असल्याचंही सिद्ध होत आहे असे फडणवीस म्हणाले. पवारांना गृहमंत्री अनिल देशमुखांची पाठराखण करण्यासाठी चुकीची माहिती पुरवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version