“फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या पण टीम म्हणून एकत्र काम करत राहणार”

देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

“फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या पण टीम म्हणून एकत्र काम करत राहणार”

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत असतानाच आता भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करावं. आपल्याला संघटनेसाठी काम करायचं आहे, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमीकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की, “एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं. एका निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. पण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार,” असा ठाम विश्वास त्यांनी फडणवीस यांच्याबद्दल व्यक्त केला आहे.

“निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत आम्हाला २ लाख मतं जास्त मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे. राज्यातदेखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पुढेदेखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!

नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव

“महायुतीला कमी जागा मिळण्याचं कारण सर्वांना माहिती आहे. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, अशी दिशाभूल करुन, एक अपप्रचार करुन, या ठिकाणी मिळवलेली मतं आहे. त्यामध्ये विरोधकांना काही प्रमाणात यश मिळालं. या विरोधकांची खरे चेहरे जनतेला दिसतील. मूळ मतदार त्यांच्यापासून दुरावले आहेत. काही काळानंतर ज्यांचा संभ्रम झालाय, तो संभ्रम दूर होईल आणि यांचा खरा चेहरा दिसेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Exit mobile version