फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव

फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. गृहमंत्र्यांनी सदनाची दिशाभूल करत अन्वय नाईक प्रकरणामध्ये चुकीची माहिती पुरवली असल्याचे सांगत फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.

काल (९ मार्च) देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणात सरकारला घेरले. मनसुख हिरेन प्रकरणात विधानसभेत विमला हिरेन यांचा जवाब त्यांनी वाचून दाखवला. यामध्ये त्यांनी विमला हिरेन यांनीच सचिन वाझेंवर मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा आरोप केला आहे असे फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवले. सचिन वाझे प्रकरणात सरकारवर दबाव आणल्यानंतर सरकारकडून आधी अनिल परब यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा प्रश्न काढला. त्यावरही जेंव्हा फडणवीसांनी थेट डेलकरांची सुसाईड नोट सभागृहात दाखवली तेंव्हा सत्ताधारी पक्षात स्मशान शांतता पसरली.

हे ही वाचा:

अजित पवरांच्या विरोधात हक्कभंग

यावर सत्ताधारी पक्षाकडून भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या मुद्द्यावरून फडणवीसांना लक्ष केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना तेच गृहमंत्री देखील होते तेंव्हा त्यांनी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.

यावरच आज ही संपूर्ण माहिती चुकीची असून सर्वोच्च न्यायालयाने या केस संदर्भात आधीच निकाल दिला असल्याने, अनिल देशमुख यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला.

Exit mobile version