फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये पूरग्रस्त लोकांना वाचवण्याचे काम यंत्रणा करत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात वर्ध्याला पुराचा फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय. रात्री ढगफुटी झाल्यामुळे पावसामुळं अनेक गावांना पुरानं वेढलं आहे. शेकऱ्यांची पेरणी खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. त्यामुळे आता लगेच पेरणी करणे शक्य नाही. तसेच रेस्क्यूच काम अतिशय वेगाने सुरु आहे. अत्यंत अवघड परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!

पुढे ते म्हणाले, देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक इथं सुद्धा पुराच्या पाण्यानं शिरकाव केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जातं आहे. त्या सगळ्यांची नीट व्यवस्था करणार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. दरम्यान, विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे.

Exit mobile version