रझा अकादमी कायम काँग्रेसच्या काळातच कशी सक्रिय होते?

रझा अकादमी कायम काँग्रेसच्या काळातच कशी सक्रिय होते?

रझा अकादमी कायम काँग्रेसच्या काळातच कशी सक्रिय होते? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. रविवार, २१ नोव्हेंबर रोजी फडणवीस हे अमरावतीतील दंगलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

यावेळी कट्टरपंथी संस्था रझा अकादमी ही कायम काँग्रेस सरकारच्या काळातच कशी सक्रीय होते आणि दंगली घडवते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. त्यांनी २०१२ साली मुंबई येथे झालेल्या दंगलीचा ही संदर्भ दिला आहे. २०१२ साली आझाद मैदान येथे रझा अकादमीने मोर्चा काढून दंगल घडली होती. त्या वेळीही सत्तेत काँग्रेस पक्षाचे सरकार होते. आत्ताही महाराष्ट्राचे दंगे झाले त्यात रझा अकादमीचे नाव पुढे आले असून सरकार काँग्रेसचेच आहे यावर त्यांनी बोट ठेवले आहे.

हे ही वाचा:

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

दक्षिणेत पुराचे थैमान सुरूच

लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

यावरून रझा अकादमी नेमके कोणाचे पिल्लू आहे किंवा बी टीम आहे हे लक्षात येत असेल असे फडणवीस म्हणाले आहेत. तर रझा अकादमीच्या नेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटो असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तर माध्यमांनी ते फोटो दाखवले नाहीत यावरही त्यांनी बोट ठेवले.

रझा अकादमी हा भाजपाचे पिल्लू आहे असे म्हणणाऱ्यांवरही फडणवीस बरसले आहेत. ‘जे म्हणतात रझा कदम हे भाजपच्या पिल्लू आहे तर मी आज या ठिकाणाहून मागणी करतो की रझा आकदमी वर कायमची बंदी घालावी. पण ते करण्याची सरकारमध्ये हिंमत आहे का असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

Exit mobile version