रस्ते दुरुस्ती मुद्द्यावर आता फडणवीसांनी विचारले सवाल

रस्ते दुरुस्ती मुद्द्यावर आता फडणवीसांनी विचारले सवाल

महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से आहेत. नुकताच आता प्रस्तावित रस्ते दुरुस्तीचा मुद्दा हा चर्चेत आहे. यावरून मोठी राजकीय खडाजंगी सुद्धा होऊ लागलेली आहे. त्यालाच अनुसरून माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांना पत्र पाठवले आहे. पत्र पाठवून त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाबाबत शंका उपस्थित केली आहे.

विरोधकांकडून या निविदा प्रक्रियेवर शंका व्यक्त केली जात होती. त्यातच आता फडणवीस यांचे पत्र मिळाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी रस्ते विभागाला पत्र पाठवले. हे पत्र पाठवून त्यांनी खुलासा मागवला आहे. स्थायी समितीत झालेल्या चर्चेत भाजप विकासकामात खोडा आणत असून त्यांच्या मर्जीतील कंत्राटदार यात नसतील म्हणून हे प्रकार केले जात असल्याचा प्रतिहल्ला अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चढवला होता. महानगरपालिकेकडून १२०० कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी निवीदा मागवल्या आहेत. परंतु यामध्ये कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित खर्चा पेक्षा २६ ते ३० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळेच भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सदर निविदा रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी केली. यालाच अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनीही आयुक्त चहल यांना पत्र पाठवून कमी किंमतीत होणाऱ्या कामामुळे दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे.

हे ही वाचा:

बीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा

लस दिल्यानंतरची पोटदुखी

‘सोमैय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई बेकायदेशीर’

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

अतिरीक्त आयुक्त पी.वेलरासू यांनीही रस्ते विभागाला पत्र पाठवून २६ ते ३० टक्के कमी दाराने आलेल्या निविदांबाबत स्पष्टीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच आता ही रस्ते दुरुस्ती चांगलीच अडचणीत येणार आहे हे चिन्ह स्पष्ट दिसत आहे.

Exit mobile version