अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब

अरे छट् हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब

विरोधी पक्ष नेते आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या बीकेसी येथे झालेल्या भाषणाची खिल्ली उडविली आहे. अरे छट्, हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब असे त्यांनी ट्विट केले आहे. १५ मे म्हणजेच आज फडणवीस आपल्या सभेतून पोलखोल करणार आहेत. मागे पोलखोल सभेत बोलताना त्यांनी १५ तारखेला आपण खरी पोलखोल करू असे म्हटले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या सभेला फडणवीस काय उत्तर देणार ते रविवारी स्पष्ट होणार आहे.

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!

बीकेसी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी सभा झाली. त्यात त्यांनी नेहमीप्रमाणेच भाजपाला लक्ष्य केले. पण या सभेला उपस्थित प्रेक्षकांमध्ये निरुत्साह दिसला तसेच तेच रटाळ विषय पुन्हा एकदा उपस्थित केल्याची टीका विरोधकांनी केली. त्या सभेत फडणवीस यांच्यावर पातळी सोडून मुख्यमंत्र्यांनी टीका केली. फडणवीस यांच्यावर शारीरिक टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.

हे ही वाचा:

निरुत्साहाची मास्टर सभा

मुन्नाभाईचा केमिकल लोचा आठवत राज ठाकरेंवर टीका

माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस, सोमय्यांबद्दल बोलताना ‘घसरले’!

 

या सभेची जाहिरात गेले काही दिवस शिवसेनेच्या वतीने करण्यात येत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरून शिवसेनेने ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली होती. त्या सभेचे टीझरही टाकण्यात आले होते. त्यात हिंदुजननायक अशी उपाधीही उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्यावरून मनसेने त्यांना ही उपाधी चोरल्याचा आरोप केला होता.

Exit mobile version