भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यसभा निवडणुकीच्या बाबत मोठे विधान केले आहे. भाजपाचे दोन खासदार राज्यसभेत निवडून जाणार आहेतच पण आमच्याकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचेही संख्याबळ आहेत असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या वाक्याचे चांगलीच चर्चा रंगली आहे.
गुरुवार, १९ मे रोजी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नेतृत्व आणि संसदीय समिती याबाबत निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी
‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’
‘काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवाद पक्ष’
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
यावेळी संभाजी राजे यांच्या उमेदवारीबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केले. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारला असता गेल्यावेळी मोदीजींनी राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे यांना खासदारकी दिली होती. यावेळी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जर का आमचा पाठिंबा हवा असेल तर त्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर होईल असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार जर भाजपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला तर ती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे येणारी राज्यसभा निवडणूक ही खूपच रंगतदार ठरणार आहे.