31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणअडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केले लक्ष्य

Google News Follow

Related

या सगळ्या राड्यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्याकडून फडतूस या शब्दाचा वापर केल्याबद्दल फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षांचा उद्धव ठाकरे यांचा कारभार पाहिल्यावर फडतूस कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. माझा सवाल असा आहे की, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी केली नाही. सचिन वाझे, या कलंकित मंत्र्यांच्या भोवती ते लाळ घोटत होते. पोलिस ज्यांच्या काळात खंडणी घेत होते. त्यांना बोलण्याचा अधिकार काय? आमचं तोंड उघडलं मग त्यांना पळता भुई थोडी होईल. बोलणे सुरू करीन तेव्हा पळावे लागेल. हा थयथयाट नैराश्य आहे त्याला उत्तर देणेच आवश्यक नाही. फक्त खुर्ची करता लाळ घोटता त्यामुळे खरा फडतूस कोण हे जनतेला माहीत आहे. या निमित्ताने याचे उत्तर त्यांना जनता देईल.

फडणवीस म्हणाले की, मी पाच वर्षे गृहमंत्री होतो. आताही आहे. काही लोक मात्र पाण्यात देव ठेवून बसले आहेत ते माझे गृहमंत्रीपद जावे म्हणून. पण मी तुमच्या मेहेरबानीने गृहमंत्री नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे. जो कुणी चुकीचे काम करील त्याला जेल होईल.

हे ही वाचा:

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

कुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे… चला नावे सुचवा!

विद्वत्ता, निर्भयतेचे महामेरू भगवान महावीर

एखादी घटना घडली निष्पक्ष चौकशी आमचे सरकार करेल राजकारण करू नये. ते योग्य नाही. उचित चौकशी होईल. चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होईल. फडणवीसांनी चाणक्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, चाणक्य म्हणाले होते की, राज्यातले चोर, अपप्रवृत्तीचे लोक राजाविरोधात बोलतात तेव्हा राजाने योग्य काम केलेले असते. अर्थात, मी राजा नाही. पण चाणक्य जे बोलले ते होत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे तसेच ठाकरे यांच्यात रोज वादविवाद होत आहेत.

बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंना शेवटचा इशारा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांच्या बाबत केलेल्या विधानावरून इशारा दिला आहे. फडणवीसांबद्दल पुन्हा असे बोलले गेले तर आम्ही सहन करणार नाही. फडणवीसांबद्दल बोलाल तर उद्धव ठाकरेंना भाजपा सोडणार नाही, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे फडणवीसांना असे बोलतील असे वाटले नव्हते. बाळासाहेबांचा मुलगा एवढीच उद्धव ठाकरेंची ओळख बनली आहे. ठाकरेंनी राजकारण खालच्या पातळीवर आणले. त्यांनी फडणवीसांना आवाहन केले की, फडणवीसांनी आता रौद्र रूप दाखवून सरकारचे सर्व अधिकार वापरून यांच्याविरोधात कारवाई करावी. फडणवीस संस्कारक्षम आहेत त्याचा हे फायदा उठवत आहेत. उद्धव ठाकरेंना शेवटची संधी दिली आहे. आता या घरकोंबड्याला आम्ही घरीच ठेवू

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा